#CoronaVirus | देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Goevrment.jpg)
नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधितांची संख्या 18 हजारांवर गेली आहे. आतापर्यंत देशात 18 हजार 601 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 1336 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं दिलासादायक चित्र आहे.
गेल्या 24 तासांत 705 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसांत इतके रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असून आतापर्यंतचा हा आकडाही सर्वांत जास्त आहे. आतापर्यंत देशात एकूण 3252 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी याबाबत दिली. अग्रवाल यांनी, देशात 14759 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं सांगितलं. देशातील 61 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. राजस्थानमधील प्रतापगढमध्ये गेल्या 28 दिवसांपासून कोणीही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नसल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.