Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशभरात चोवीस तासांत 3 हजार 277 नवे रुग्ण,127 मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 277 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 127 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 62 हजार 939 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 41 हजार 472 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 19 हजार 358 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 2 हजार 109 जणांचा समावेश आहे.
Spike of 3277 #COVID19 cases & 127 deaths in the last 24 hours. Total cases in the country now at 62939, including 41472 active cases, 19358 cured/discharged/migrated and 2109 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/XoGLfUF3Jr
— ANI (@ANI) May 10, 2020





