Breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus | ‘त्या’वस्त्यांना भुजबळ यांचा मोठा दिलासा

मालेगाव | करोनाबाधीत क्षेत्रांना अन्न धान्याचा तुटवडा भासू देणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी करोनाच्या छायेखाली सीलबंद झालेल्या वस्त्यांना आश्वस्त केले आहे.मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात करोनाच्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ बोलत होते. येणाऱ्या रमजानपर्यंत मालेगाव शहरातून करोना विषाणूला हद्दपार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले.

भुजबळ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण मंदीर, मशीद, चर्चमधील सामूहिक पूजा, नमाज, प्रार्थना थांबविल्या आहेत. त्याच प्रमाणे सामाजिक प्रथा ज्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर संचार होतो तो थांबविल्या पाहिजेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button