breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: जनता कर्फ्यूला कोल्हापूरकारांचा झणझणीत प्रतिसाद, मटणाच्या दुकानासमोर रांगाच रांगा
कोल्हापूर म्हटले की झणझणीत मटणाचा तांबडा पांढरा रस्सा आठवतो. त्यातही रविवारचा दिवस म्हटला की कोल्हापूकरांकडे मटण शिजणारच. २२ तारखेचा म्हणजेच उद्याचा रविवार तरी अपवाद कसा ठरेल? देशाच्या पंतप्रधानांनी उद्या रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. ते कोल्हापूरकर पाळणार आहेत. मात्र मटणापासून दूर राहणार नाहीत हे नक्की. त्यामुळेच शनिवारी मटणाच्या दुकानाबाहेर रांगा दिसून आल्या.