#CoronaVirus: कोल्हापुरात लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरीच उपचार होणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/kolhapur-municipal-corporation-shivaji-chowk-kolhapur-kolhapur-government-organisations-c5xn6l.jpg)
कोल्हापूर: राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर घरच्या-घरीच उपचार केले जाणार आहेत. त्यादृष्टीने खासगी रुग्णालयांना निर्देश देण्यात आलेले असून लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या देखरेखीखाली हे उपचार होतील. कोल्हापूर महानगरपालिकेने या निर्णयाची अंमलबजावणीही सुरु केलेली आहे.
सध्याच्या घडीला दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत. अर्थात यासाठी संबंधित रुग्णाच्या घरी स्वतंत्रपणे राहण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. आता आगामी काळात हा निर्णय कितपत यशस्वी ठरतो, हेदेखील पाहावे लागेलच. तसेच राज्याच्या इतर भागातही अशाप्रकारची व्यवस्था राबविली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.