Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोना विरोधात लढण्यासाठी अवघा देश एकवटला, सगळीकडे दिव्यांची रोषणाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Go-corona.jpg)
करोना विरोधात लढण्यासाठी अवघा देश एकवटला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. नउ मिनिटांसाठी राष्ट्रपती भवनासह देशातली सर्व शहरांमध्ये दिवे लावण्यात आले. घरातले लाईट बंद करुन लोकांनी गॅलरी किंवा दारामध्ये दिवे लावले. पणती, मेणबत्ती किंवा मोबाईल टॉर्च घेऊन लोक उभे होते. करोनाच्या संकटाशी देश सामना करतो आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र आम्ही सगळे एक आहोत ही भावना देशवासीयांच्या मनात आहे. तसेच करोनाविरोधात दिव्यांची आणि अवघ्या जनतेची एकजूट पाहण्यास मिळाली.