#CoronaVirus: कोरोनाला टाळण्यासाठी स्वत:हून हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन घेऊ नका, ICMR चा सल्ला
![The dry run of corona vaccination will be held on January 2 in ‘Ya’ 4 districts of the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/vaccine-1.jpg)
हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेलेच घेऊ शकतात. हे औषध सर्वांसाठी नाही असे इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध डॉक्टर आणि COVID-19 रुग्णांच्या संपर्कात आलेलेच घेऊ शकतात असे आयसीएमआरचे वरिष्ठ वैज्ञानिक रमन आर गंगाखेडकर यांनी सांगितले. प्रत्येकाने हे औषध घेऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या करोना व्हायरसवर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यामुळे काही जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च करोनाची बाधा होऊ नये म्हणून हे औषध घेत आहेत. अशा लोकांना आयसीएमआरने पुन्हा एकदा सावधान केले आहे. हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची कमतरता निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य मंत्रालयाने या औषधाला अत्यावश्यक औषध म्हणून जाहीर केले आहे. या औषधाच्या विक्रीवर आणि वितरणावर निर्बंध आणले आहेत.