Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus | औरंगाबादेत १११७ तर नांदेड-रत्नागिरी रुग्णसंख्येची गाठली शंभरी

औरंगाबाद | राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा अकराशेपार गेला आहे. तर नांदेड, रत्नागिरीत रुग्णसंख्येची शंभरी पार गेली असून उस्मानाबादची रेड झोनच्या दिशेने वाटचाल झाली आहे. तर मालेगावरमध्ये कोरोना रुग्णांची भर पडत आहे. पुण्यातही ३२ रुग्ण आढळून आले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

नांदेडमध्ये कोरोनाचे नव्याने आठ रुग्ण आढळलेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरचा आकडा पार केला आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण १०६ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरीपार झालाय. जिल्ह्यात आणखी 16 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ८२ पैकी १६ अहवाल पॉझिटीव्ह आलेत तर ६६अहवाल निगेटिव्ह आलेत. रत्नागिरी, संगमेश्वर आणि गुहागरमध्ये नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. नव्याने आढळलेले रुग्ण मुंबईहून कोकणात दाखल झालेले आहेत. सध्या रत्नागिरीतील कोरोनाबाधितांचा आकडा १०८ वर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button