#CoronaVirus | औरंगाबादेत कोरोनाचा 10 वा बळी, 55 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू
औरंगाबाद | औरंगाबादेत कोरोनाचा 10 वा बळी गेला आहे. 55 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती सातारा परिसरातील रहिवासी होता. मृताचा रात्री 10 वाजता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही 283 वर गेली आहे. तर दहा जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 25 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सतत होत असलेल्या रुग्णांच्या वाढीमुळं औरंगाबादकरांच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे.
रात्री नव्याने शहरात नऊ रुग्ण आढळून आले. हे रुग्ण गुलाब वाडी, भीमनगर, संजयनगर, मुकुंदवाडीमधील असल्याची माहिती मिळत आहे. तर मृत व्यक्ती सातारा परिसरातील होती. रविवारी सकाळीच शहरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत 17 रुग्णांची भर पडली होती. आणि रात्री पुन्हा एकदा कोरोनाचे 9 नवीन रुग्ण आढळून आल्यानं औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूणच आकडा 283 वर गेला आहे. तसेच आतापर्यंत 25 रुग्ण या आजारातून बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.