Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#Coronavirus: औरंगाबादमध्ये आणखी 17 नवे रुग्ण, एकूण संख्या 373 वर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus_505_120220063825_150220062439-1.jpg)
करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये करोना रुग्ण संख्येत मागील काही दिवसांत झपाट्याने वाढ झाली असताना आज, शहरात 17 नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परिणामी शहारतील करोनाबाधितांची एकूण संख्या 373 वर पोहचली आहे.