Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: अहमदाबादमधील काँग्रेसच्या नगरसेवकाला कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-10.jpg)
काँग्रेस पक्षाचे नगरसेवर बद्रुद्दीन शेख यांना करोनाची लागण झाली असल्याचे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. शेख हे शहरातील बेहरामपुरा विभागातील नगरसेवक असून त्यांनी करोना चाचणीसाठी दोन दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. शेख यांना करोनाची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाल्यानंतर त्यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आले होते, मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे अहमदाबाद पालिका आयुक्त विजय नेहरा यांनी सांगितले.