Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: अर्थमंत्री निर्मला सीतारामन PSU बँकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/bank-800x312-1.jpg)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक घेणार आहेत. यामध्ये कर्जची स्थिती आणि याव्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे. ही बैठक करोना व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये कर्ज घेतलेल्या ग्राहकांपर्यंत व्याज दरातील कपातीचा फायदा पोहोचवण्यापासून कर्ज फेडण्याच्या कालावधीत सुट देण्याच्या बँकांच्या योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.