Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
#CoronaVirus: औरंगाबादेत 38 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या 546 वर

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 38 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 546 वर पोहचली आहे.





