#CoronaVirus:सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/816468.jpg)
सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. . सांगली जिल्ह्यातील हा चौथा बळी आहे. तर . सांगलीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सांगलीतील कडेगाव तालुक्यातील नेर्ली येथील कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. नेर्ली येथील ५७ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. या रुग्णांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णाला नॉन इन्व्हेजिव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तसेच त्यांना मधुमेह होता.
दरम्यान, ही व्यक्ती १८ मे रोजी मुंबईहून आलेली होती. या रुग्णाचा मृत्यू झाला आहे . सांगली जिल्ह्यात आज आखेर मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सध्यस्थितीला सांगली जिल्ह्यात ५० जण कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु आहेत.
तर आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०९ रुग्ण आहेत.