breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट, दुसरं वर्ष भयंकर जाणार – जागतिक आरोग्य संघटना

 

नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट भारताला अत्यंत घातक ठरली आहे. वेगाने संसर्ग पसरत असल्याने नियमित ४ हजारांहून अधिक बाधितांचा मृत्यू होतोय. नियमित वाढणाऱ्या रुग्णांची संख्याही साडेतीन लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला असून वैद्यकीय सुविधांचीही वाणवा आहे. त्यामुळे कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे,

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयियस (Tedros Adnom Ghebreyus) यांनी दिलेल्या माहितीनुसार, WHO कडून कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारताला मदतही दिली जात आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, हजारो ऑक्सिजन केंद्र, मास्क आणि इतर वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ही चिंताजनक आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोना रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या, मृत्यूची संख्या वाढत आहेत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरं वर्ष आणखी भयंकर

कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत असून त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले.

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. रुग्णालयात जागाच नसल्यानं उपचारांअभावी रुग्ण प्राण सोडत आहेत. तर मरणानंतरही मृतदेहांचे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले.

लहानग्यांना लस देण्यापेक्षा गरजूंना द्या

दरम्यान अनेक श्रीमंत देशामध्ये आता लहान मुलांना तसेच किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर दुसरीकडे गरीब देशांमध्ये आता कुठे आरोग्य कर्मचारी आणि गरजू लोकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. तरुण आणि निरोगी लोकांना लस देण्याऐवजी त्यांनी कोवॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन-शेअरिंग योजनेस त्यांचे डोस दान करावेत. तसेच देशातील गरजू लोकांचे कोरोनापासून संरक्षण करावे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button