मराठा आरक्षणाचा लढा आता मुंबईत! उपोषणाच्या १४ व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर आज, १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता समर्थकांची एक महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मुंबईत धडक देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही,” असा इशारा देत त्यांनी स्पष्ट केले की आता आंदोलकांची पावले मुंबईच्या दिशेने पडतील. सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अखेर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा
विसर्जन घाटांवर सुरक्षा व सुविधांची महापौर रवि लांडगे यांच्याकडून पाहणी
मनोज जरांगे यांनी यापूर्वीच १२ तारखेनंतर मुंबईला जाण्याचा इशारा दिला होता. आजच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी आणि मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.




