निमगाव चोभा येथे यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार; ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप
यशस्वी झालेले विद्यार्थी निमगाव चोभा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी
![Congratulations to the students who achieved success at Nimgaon Chobha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Nimgaon-Choba-780x470.jpg)
आष्टी | गावातून गुणवंत विद्यार्थी तयार होऊन राज्यात आणि देशात गावाचा नावलौकिक व्हावा, अशी प्रत्येक गावाची अपेक्षा असते. आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलं आहे. सोमवारी या यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.
ऋषिकेश दादासाहेब गाडे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी महाराष्ट्र शासन येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदी खुल्या प्रवर्गातून निवड झाली आहे. तसेच विकास पांडुरंग गाडे यांची गेल्या वर्षी महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झालेली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तलाठी भरती परीक्षेत स्नेहल भाऊसाहेब थेटे यांची तलाठी पदी निवड झालेली आहे. तसेच हर्षवर्धन बळीराम थेटे यांची ICICI बँकेत डेप्युटी मॅनेजर म्हणून नियुक्ती झालेली आहे. ओंकार किशोर गाडे याने एमबीबीएसकरिता सिंधुदुर्ग येथे प्रवेश मिळवला आहे. शुभम अण्णा साहेब गाडे-एमबीबीएस आणि शमिक अशोक गाडे(BDS) या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा – राज्यसभेच्या ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक, महाराष्ट्रातील ‘या’ ६ जागांवर निवडणूक
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यशवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील विविध बाबी सांगत लोकांना प्रेरित केले. सातत्य, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम घेतल्यास आपण नक्कीच यशाला गवसणी घालू शकतो असं, मत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल. मनोगत व्यक्त करत असताना मिळवलेल्या यशाचा श्रेय हे आई-वडील, शिक्षक आणि विशेषतः गावातील जिल्हा परिषद शाळेचा उल्लेख यशस्वीतांनी केला. पाठीवर कौतुकाची थाप टाकल्यामुळे आणि प्रोत्साहन दिल्यामुळे निमगाव चोभा ग्रामस्थांचे आभार देखील मानले. जे गुणवंत उपस्थित राहू शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
दरम्यान, अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवल्याने निमगाव चोभा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं. तसेच पुढील काळात गावाचं नाव आणखी मोठं करा आणि यापेक्षा महान यश मिळवा, अशा शुभेच्छा देखील दिल्या.