ढगाळ हवामानामुळे टोमॅटो आणि वांग्याच्या पुरवठ्यावर परिणाम
कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली, पत्ता कोबी आणि फुलकोबी स्वस्त

जाधववाडी : या आठवड्यात ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम वांगे, टोमॅटोवर झाला. या दोन्हींची आवक कमी झाल्याने पाच रुपयांनी भाव वाढले. कोथिंबिरीने जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगलाच भाव खाल्ला.
कोथिंबिरीची एक जुडी १५ रुपयांना मिळत होती. हाच भाव मागील आठवड्यात केवळ दहा रुपये होता. शनिवारी (ता. आठ) बाजार समितीत १८ हजार ६०० नग कोथिंबिरीची आवक झाली. दरम्यान, पत्ता कोबी, फुलकोबी स्वस्त झाली असून, लिंबाचा दर चढाच आहे.
जाधववाडी बाजार समितीत ठोक भावात कोथिंबिरीला शेकडा आठशे रुपये मोजावे लागले. हाच भाव भाजी मंडईत वाढून प्रति जुडी १५ रुपये झाला. दोन आठवड्यांपूर्वी लिंबाचा भाव साधारण १०० रुपये प्रतिकिलो होता. या भावात वाढ होऊन मागील आठवड्यात १४० रुपये प्रतिकिलो राहिला. रविवारी (ता. नऊ) लिंबाचा दर प्रतिकिलो १४० ते १५० रुपये असा होता.
हेही वाचा : अर्थसंकल्पीय अधिवेशन: कुरघोडीच्या राजकारणात पत्रकार महामंडळ बारगळले?
भाव असे
शेवगा शेंगा १५-३० (पावशेर)
टोमॅटो ३०-४० (किलो)
मटार ४० (किलो)
वांगे ३०-४० (किलो)
वालाच्या शेंगा ५०-६० (किलो)
कोबी ३०-३५ (किलो)
गवार १२० (किलो)
काकडी ३५ (किलो)
भेंडी ६० (किलो)
पत्ता कोबी ४०-४५ (किलो)
हिरवी मिरची २५ (पावशेर)
सध्या कोथिंबीर महागली आहे. ठोक भाव आठशे रुपये शेकड्याने विक्री होत आहे, तर किरकोळ बाजारात १५ रुपये जुडी आहे. सकाळी २० रुपयांनाही विक्री झाली.