पुढील दोन महिने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य, केंद्राचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/ration.jpg)
नवी दिल्ली – देशात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे गोर गरीबांची रोजी रोटी पुन्हा एकदा थांबली आहे. अशा काळात नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ येऊ नये याकरता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकरारने दिला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मे आणि जून महिन्यात ५ किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा ८० कोटी नागरिकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे गरीब जनतेला दिलासा मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार २६ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यावेळी सर्वच सेवा आणि सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांच्या रोजगारीवर गदा आली होती. अशा काळात गोर गरिबांना उपाशी राहायला लागू नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राबवण्यात आली. कालांतराने लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आता पुन्हा अनेक राज्यांत लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने केंद्र सरकारने ही योजना पुन्हा राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, रकारनं दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.
नोव्हेंबर २०२० पासून केंद्र शासनानं पंतप्रधान गरीब कल्याण योजना बंद केली होती. आता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवल्यानं गरीब आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.