breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

CBSE कडून बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयात सादर

नवी दिल्ली – कोरोना प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा नुकत्याच रद्द करण्यात आल्या आहेत. आता सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. त्यानुसार सीबीएसई बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामध्ये दहावी, अकरावी आणि बारावीचे 30:40:40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. तसेच सीबीएईने 31जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे.

इयत्ता १०वी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते ११ वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि Prelim परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे 1 जून रोजी सीबीएसई बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता बारावीच्या परीक्षेचं मूल्यमापन कसं केलं जाणार याची चर्चा सुरु होती. निकालाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यांची एक समिती गठीत कऱण्यात आली होती. या समितीने हा मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button