Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
CAA / NRC : पश्चिम बंगाल, बिहारमध्ये विरोधक व समर्थकांमध्ये तुफान मारहाण, दोघांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/bihar-and-bangal.jpg)
सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी(एनआरसी) च्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. पश्चिम बंगाल व बिहारमध्ये याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. या ठिकाणी या कायद्याचे विरोधक आणि समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे पहायला मिळालेले आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात दोन गटात निर्माण झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. या ठिकाणी चक्क एकमेकांवर गोळीबार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. या हिंसेत दोन जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे.
याचप्रमाणे बिहारमधील सीतामढी येथे देखील या कायद्याच्या समर्थक व विरोधकांमध्ये आज प्रचंड हाणामारी झाली. ज्यामध्ये १५ जण जखमी झालेले आहेत.