Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

Breaking News : गँगस्टर अतिक अहमद आणि भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या; देशभरात प्रचंड खळबळ…!

प्रयागराज: गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रयागराज पोलीस दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन जात असताना वाटेत हा गोळीबार झाला, त्यात दोन्ही भावांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

या गोळीबारानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. गोळीबारानंतर घटनास्थळाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून ज्यामध्ये दोन्ही भावांचे मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोड्या पडलेले दिसत आहेत.

या घटनेबाबत अधीक माहिती अशी की, प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलजवळ पोलिसांचे पथक अतिक आणि अहमद यांना घेऊन जात असताना तीन ते चार हल्लेखार दुचाकीवरून आले. दरम्यान ते अचानक आले व त्यांनी दोन्ही भावांवर जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा गोळी लागून तो जखमी झाला आहे. दरम्यान हल्लेखोरांचे माहिती अद्याप उघड करण्यात आली नाही. हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर तब्बल 24 राऊंड फायर केले आहे. गोळाबाराचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button