breaking-newsताज्या घडामोडीसातारा

‘किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

भुईंज : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार (दि.२४) दुपारी एक वाजता वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नुकताच किसन वीर-खंडाळा कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. किसन वीर व किसन वीर- खंडाळा या दोन्ही कारखान्यावरील तोडणी यंत्रणाही लवकरच कार्यस्थळावर दाखल होणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊसही वेळेत तुटणार असल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा – धक्कादायक! नवरात्रीत गरबा खेळताना २४ तासांत १० जणांचा मृत्यू

या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button