ATS ची मोठी कारवाई! लखनऊमध्ये ‘अल कायदा’चे दोन दहशतवादी पकडले
![Big action of ATS! Two Al Qaeda terrorists arrested in Lucknow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Lucknow-ATS.jpg)
नवी दिल्ली |
लखनऊमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) मिळाली होती. यानंतर तेथील काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला एटीएसने वेढा कारवाई करत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. हे दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेचे असल्याची माहिती समोर आली असून, दोघेही पाकिस्तानी हस्तक आहेत. याचबरोबर एटीएसच्या हाती मोठ्याप्रमाणावर स्फोटके देखील लागल्याने, एकप्रकारे घातपातचा मोठा कट उधळला गेल्याचे सांगितले जात आहे.
Lucknow ATS conducts searches in Kakori. Details awaited. pic.twitter.com/gPcqRbKMmL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 11, 2021
एटीएस कडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू आहे. एटीएस सोबत स्थानिक पोलीस देखील या शोध मोहीमेत सहभागी झालेले आहेत. परिसरातील बरचशी घरं देखील रिकामी करण्यात आली असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकास देखील पाचारण करण्यात आले आहे. तर, अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे. सकाळी १० वाजेपासून ही विशेष मोहीम एटीएसने सुरू केलेली आहे, जी अद्यापही सुरू आहे.