Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

अरविंद केजरीवाल यांनी केले नितीन गडकरींचे कौतुक

Arvind kejriwal : लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. मात्र, आता केजरीवालांनी थेट भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे.

एकीकडे सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे अरविंद केजरीवाल यांनी गडकरींचे कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासोबतच, केजरीवाल यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना स्वच्छ मनाचे नेते म्हटले आहे.

एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले. मुलाखतीमध्ये केजरीवाल यांना भाजपच्या कोणत्या नेत्याचे काम आवडते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, नितीन गडकरी हे एक व्यक्ती म्हणून मला चांगले वाटतात. त्यांचे काम देखील चांगले आहे. त्यांनी रस्तेनिर्मितीबाबत चांगले काम केले आहे, अशा शब्दात केजरीवालांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा –  ‘जातीच्या नावावर विष पसरवण्याचा प्रयत्न’; पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

आतापर्यंत काँग्रेससह विविध पक्षातील नेत्यांकडून नितीन गडकरींचे कौतुक करण्यात आले आहे. आता या नेत्यांच्या यादीत अरविंद केजरीवाल यांचा देखील समावेश झाला आहे.

या मुलाखतीमध्ये त्यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह याचे देखील कौतुक केले. एका प्रश्नाचे उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, ‘ते शिक्षित होते, शांत स्वभावाचे होते. शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, मनरेगा, अणुकरार अशी अनेक कामे त्यांनी केली आहेत. 2008 मध्ये जगभरात मंदी असताना, देशाला वाचवणारे तेच होते.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button