TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
पाकिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, दोन मेजरसहित सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू
पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत सहा लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन मेजर आणि ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या (SPG) तीन कमांडोंचा समावेश आहे. बलुचिस्तानातील हरनाई भागात एका उड्डाण मोहिमेदरम्यान हा अपघात झाला आहे. पाकिस्तान लष्कराने या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नाही.
🛑Very unfortunate and sad news..
— Mona Khan (@mona_qau) September 26, 2022
Another Heli crash news is coming from balochistan.
6 on board including two Maj and 3 SSG commandos
पाकिस्तानातील आंतर सेवा जनसंपर्क कार्यालयाने या अपघाताची पुष्टी केल्याचे वृत्त पाकिस्तानातील वृत्तपत्र ‘डॉन’ने प्रकाशित केले आहे. या दूर्घटनेत सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.





