ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

अलिबाग येथे सुपरस्टार राजेश खन्ना यांना गाण्यांतून स्वरांजली

सिंगिंग स्टार्स कराओके स्टुडिओचा उपक्रम

रायगड : .. जय जय शिवशंकर.. भिगी भिगी रातों मे.. ये रेशमी जुल्फे.. कटी पतंग.. मेरे सपानों की राणी कब आएगी तू.. गोरे रंग पे न इतना गुमान कर.. रूप तेरा मस्ताना.. रैना बीती जाये.. अच्छा तो हम चलते है.. शायद मेरे शादी का खयाल.. अशी अनेक सुपरहिट गाण्यांनी सुपरस्‍टार अभिनेते राजेश खन्ना यांना स्‍वरांजली अर्पण करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील राजेंद्र बोराडे व आशा बोराडे यांच्या वतीने चालवला जाणाऱ्या सिंगिंग स्टार्स कराओके स्टुडिओच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अलिबाग मधील अनेक कलाकार सहभागी झाले होते. राजेश खन्ना यांच्‍या पुण्यतिथी निमित्‍त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सुप्रभा आरेकर, मानसी गावडे, अशोक मांडके, राजेश्वरी मोरे, श्याम घरत, अरविंद गोसावी, मनोहर पाटील, राजेंद्र नरबेकर, प्रदीप पाटील, सारिका वर्तक, भूषण पाटील, शोभना राजपूत, शोभा भोगे, राजू जाधव, शारदा धुळप, ज्योती मयेकर, अरविंद गोसावी, नीलिमा खरसांबळे, धनाजी कांबळे, मनोहर पाटील, आराध्या नरबेकर, ज्योती मयेकर, प्रदीप शेलार, महेश पोरे, भूषण पाटील, साईनाथ पाटील, राजेंद्र बोराडे, सचिन बंडगर, श्याम घरत, प्रवीण लोखंडे, संदीप पालकर या गायकांनी सहभाग घेऊन राजेश खन्ना यांना स्वरांजली वाहिली.

हेही वाचा :  ‘‘एसबीपीआयएम’’ शैक्षणिक स्वायत्तता अभिमानास्पद; ज्ञानेश्वर लांडगे

या वेळी स्टुडिओचे संचालक राजेंद्र बोराडे म्‍हणाले की, मी स्वप्न बघायची आणि तुम्ही पूर्ण करायची, असे आपले नाते आहे. सर्वांनी गायलेली गाणी उत्‍तम असून सर्वांना 100 पैकी 100 मार्क आहेत. तसेच सर्वांनी उपस्थित राहून सुपरस्टार राजेश खन्ना यांना गाण्यांतून स्वरांजली वाहिली. कार्यक्रमात उत्साह निर्माण केला, याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

स्टुडिओच्या संचालिका आशा बोराडे यांनी प्रास्ताविक व महेश पोरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप साठे आणि सतीश पानसरे ऑपरेटिंगचे काम पाहिले तर स्नेहा कांदू यांनी साउंड सिस्टीम ऑपरेटिंगचे काम पाहिले..कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button