Air India – वरिष्ठ विचारायचा, तुला रोज सेक्सची गरज वाटत नाही? वाचा धक्कादायक बातमी
नवी दिल्ली: Air India मध्ये वैमानिक म्हणून काम करणाऱ्या महिलेने तिच्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. लैंगिक छळाच्या या आरोपांप्रकरणी एका वरिष्ठ वैमानिकाची सध्या चौकशी सुरू आहे. या महिलेने तिच्यासोबत घडलेले प्रकार व्यवस्थापनाला सांगितले आहे ज्यामध्ये हैदराबादमध्ये या वरिष्ठ वैमानिकाने तिला अश्लील तसेच खासगी जीवनाशी निगडीत प्रश्न विचारून कसा त्रास दिला याचाही समावेश आहे.
एनडीटीव्ही च्या संकेतस्थळावर यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्यात म्हटलं आहे की पीडित महिलेला प्रशिक्षण संपल्यानंतर प्रशिक्षकाने रात्री एकत्र जेवायला जाण्याचा सल्ला दिला होता. विमान प्रवासात वरिष्ठ वैमानिक अत्यंत शालीनतेने वागत होता, ज्यामुळे ही महिला त्याच्यासोबत रात्री जेवायला जाण्यास तयार झाली. जेवत असताना या वैमानिकाने महिलेशी अश्लील गोष्टी बोलण्यास सुरूवात केली. आपण वैवाहिक जीवनात सुखी नसून तुला रोज सेक्सची गरज वाटत नाही का असा प्रश्न या वैमानिकाने महिलेला विचारला. यावर मला बोलायचे नाही असं म्हणत ही महिला तिथून बाहेर पडली आणि टॅक्सी करून तिथून निघून गेली.