एप्रिल महिन्यांनंतर आज देशात सापडले सर्वाधिक कमी रुग्ण, पॉझिटीव्हीटी रेटही सुधारला
![The third wave in October, a warning of danger for young children](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-1-4.jpg)
नवी दिल्ली – कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीत ८ एप्रिलनंतर सर्वात कमी संक्रमित रुग्ण आढळल्याचं दिसून येतंय. सलग १२ व्या दिवशी भारताचा पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांहून कमी नोंदविण्यात आला आहे. देशात गेल्या २४ तासांत समोर आलेल्या आकड्यानुसार, भारताचा पॉझिटिव्ह रेट ५.७८ टक्के आहे.
शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात शुक्रवारी (४ जून २०२१) १ लाख २० हजार ५२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३३८० जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात १ लाख ९७ हजार ८९४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.
याचसोबत, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८६ लाख ९४ हजार ८७९ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या १५ लाख ५५ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ४४ हजार ०८२ वर पोहचलीय.