अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या; पत्रातून धक्कादायक खुलासा
![Actress Vaishali Thakkar's Suicide; A shocking revelation from the letter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-17-at-1.41.06-PM-780x470.jpeg)
इंदौर ।
16 ऑक्टोबर रोजी हिंदी टेलिव्हिजनमधून एक धक्कादायक बातमी समोर आला होता. हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्करने आत्महत्या केली होती. वैशालीने इंदौरमधील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शिवाय वैशालीने एक पत्र लिहून ठेवलं होतं. दरम्यान, या पत्राबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.
c
हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री वैशाली ठक्कर मागील 1 वर्षांपासून इंदौरमध्ये राहत होती. काल वैशालीच्या आत्महत्येची बातमी कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते आणि वैशालीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना वैशालीच्या मृतदेहाजवळ एक पत्र देखील सापडलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, तेजाजी नगर या पोलीस ठाण्यातील पोलीस सध्या तपासणी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली ठक्कर मागील अनेक दिवसांपासून खूप तणावाखाली होती. तिने लिहिलेल्या पत्रातून याबाबत लिहिलं आहे. या पत्रामध्ये वैशालीने तिचा एक्स बॉयफ्रेंड तिला त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. त्याच्या त्रासाल कंटाळून तिने आत्महत्या केली.
वैशालीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या नावाचा खुलासा या पत्रात केलेला नाही. मात्र, 2021 मध्ये याचं एक्स बॉयफ्रेंडसोबत वैशालीचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती देखील शेअर केली होती. मात्र, एक महिन्यांत वैशालीने तिचं लग्न मोडलं असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून केली करिअरची सुरुवात
वैशाली ठक्करने आपल्या करिअरची सुरुवात हिंदी टेलिव्हिजनवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून केली होती. तसेच तिने इतर मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये वैशालीने 2015 साली काम केले होते यामध्ये तिने संजना ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती ‘आशिकी’ या कार्यक्रमामध्ये देखील दिसून आली होती. या व्यतिरिक्त वैशालीने ससुराल सिमर का मध्ये देखील काम केले होते. या मालिकेत तिने अंजली भारद्वाज ही भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती.