TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी
वणी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार
![A youth was killed in a tiger attack in Vani taluka](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/tiger01-780x470.jpg)
यवतमाळ : वणी तालुक्यातील भुरकी (रांगणा) शेतशिवारात गुरुवारी सायंकाळी वाघाने युवकावर हल्ला करून त्याला ठार केले. अभय मोहन देऊळकर (२५) रा. भुरकी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भुरकी शेत शिवारात शेतातील पिकाला पाणी देत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर झडप घेतली. या हल्ल्यात तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील शेतकरी, शेतमजुरांना ही घटना समजताच आरडाओरडा करून वाघाला पिटाळून लावले. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वणी विभागात वाघाचा मुक्तसंचारामुळे शेतकरी, शेतमजुरांत भीतीचे वातावरण आहे.