शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे मारहाण करून युवकाचा प्रेयसीवर बलात्कार
![A young man raped his girlfriend by beating her for refusing to have sexual intercourse](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Rape-3-1-1-780x462.jpg)
नागपूर : शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीला मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने पोलिसात प्रियकराने बलात्कार केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकाला अटक केली असून त्याने बलात्कार केल्याची कबुली दिली आहे. विवेक रामतीर्थ गुप्ता, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक गुप्ता (२५) हा राणी दुर्गावती चौक, नागपूर येथे राहतो. तो अॅमेझॉनमध्ये पर्यवेक्षक म्हणून काम करतो. सध्या तो इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. पीडित २५ वर्षीय प्रेयसी रिया (काल्पनिक नाव) ही खासगी कंपनीत नोकरी करते. आरोपी विवेक आणि रिया गेल्या ४ वर्षांपूर्वी एकमेकांना ओळखत होते. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. यादरम्यान आरोपी विवेकने तरुणीला स्वत:च्या घरी बोलावून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या काही दिवसांपासून मोनाने शारीरिक संबंधासाठी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या विवेकने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरी शारीरिक संबंध ठेवले.
१६ सप्टेंबरला विवेकने रियाला घरी बोलावले. तिने लग्न करण्याचा तगादा लावला. परंतु, त्याने तिला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच लग्न करण्यास नकार दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे रियाने यशोधरानगर पोलीस ठाणे गाठून आरोपी प्रियकराविरोधात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.