सोन्याच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे सोन्याचा दर
![A rise in the price of gold; Know today's gold rate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Gold-Silver-Rate-Today-780x470.jpg)
Gold Silver Rate Today | आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव दररोज बदलत असतो. अशातच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली होती. अशातच आता सोन्याच्या भावात वाढ होत असतानाही बाजारात ग्राहकांचा उत्साह दिसला आहे. तर चांदीच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन चांदी आता ८२,९०० रुपये प्रति किलो झाली आहे.
गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज २२ कॅरेटनुसार २ ग्रॅम सोन्यासाठी ६,६२६ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७२,३८० रुपये मोजावे लागणार आहे.तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी ८४,९०० रुपये मोजावे लागतील.
हेही वाचा – मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत खासदार बारणे यांच्या चिंचवडमध्ये भेटीगाठी
२४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती?
मुंबई- ७२,२३० रुपये
पुणे – ७२,२३० रुपये
नागपूर – ७२,२३० रुपये
नाशिक – ७२,२६० रुपये
ठाणे – ७२,२३० रुपये
अमरावती – ७२,२३० रुपये.