breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

हेल्मेट न घालता कार चालवल्याने एक हजारांचा दंड, नेमकं काय घडलं?

Noida Police | रस्त्यावर कार, दुचाकी चालवताना नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. मात्र, आपण नियमांचं पालन केलं नाही तर वाहतूक पोलीस दंड आकारतात. आता यासंदर्भात उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हेल्मेट न घालता कार चालवणाऱ्या नोएडामधील एका व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

तुषार सक्सेना असं त्या व्यक्तीचं नाव आहे. तुषार सक्सेना हे पत्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर त्यांना हा दंड न भरल्यास कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असाही इशारा देण्यात आला. मात्र, यानंतर तुषार सक्सेना यांनी पोलिसांत धाव घेतल्याचं फायनान्शिअल एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, सध्या हे चलान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा    –      टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ जाहीर, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्त्व, पाहा संपूर्ण संघ 

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका व्यक्तीला हेल्मेट न घालता कार चालवल्याने नोएडा पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तुषार सक्सेना असं आहे. आता हे तुषार सक्सेना नोएडा शहरापासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपूरमध्ये राहतात. मात्र, त्यांना हेल्मेट न घातल्याने दंड झाल्याचा त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्यामुळे हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला हा दंड चूक म्हणून आला असेल असे म्हणत दूर्लक्ष केलं. मात्र, त्यानंतर तुषार सक्सेना यांना ईमेल आणि अतिरिक्त संदेशाद्वारे संपर्क साधला गेला. हेल्मेट न घालता गाडी चालवण्यामुळे चलान झाल्याचे पाहून तुषार सक्सेना यांना धक्का बसला. कारण कार चालकांना हेल्मेट घालणं बंधनकारक नाही. आता हे चलान गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button