4000 कोटींचा कुत्रा तर 800 कोटींची मांजर; या प्राण्यांना ‘सेलिब्रेटी’चा दर्जा
![A dog worth 4000 crores and a cat worth 800 crores](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/4000-crore-dog-780x470.jpg)
अमेरिकेची गायिका टेलर स्विफ्ट हिच्याकडे आहे 400 कोटींची ऑलिव्हिया बेन्सन नावाची मांजर
मुंबई : पाळीव प्राण्यांच्या किंमतीशी संबंधित सोशल मीडियामुळे एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या स्टडीमध्ये कुत्रा-मांजराची किंमत करोडोंमध्ये असल्याचं सांगितली गेलं आहे. यातील अनेक प्राण्यांना ‘सेलिब्रेटी’चा दर्जा देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या यादीतील एका कुत्रा हजारो कोटींचा असल्याची माहीती ‘ऑल अबाऊट कॅट्स’च्या अहवालात दिली आहे.
अमेरिकेची लोकप्रिय गायिका टेलर स्विफ्ट हिच्याकडे ऑलिव्हिया बेन्सन नावाची स्कॉटिश फोल्ड जातीची मांजर आहे. ही जगातील तिसरा सर्वात महागडा प्राणी असल्याचा दावा केला जात आहे. या मांजराची किंमत सुमारे 800 कोटींहून अधिक असल्याचं बोललं जात आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही एक मांजर आहे. या मांजरीचाही सोशल मीडियावर मोठा प्रभाव आहे. तिचे नाव नाला कॅट असून, चक्क त्या मांजराची इन्स्टाग्रामवर @Nala_cat या नावाने लोकप्रिय आईडी आहे. या मांजरीचे इंस्टाग्रामवर 44 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्टमध्ये नालाची किंमत 825 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. नालाचे नाव ‘गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंदवले गेले आहे.
महागड्या प्राण्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा गुंथर VI. त्याची मालकी इटालियन कंपनी गुंथर कॉर्पोरेशनकडे आहे. त्याची किंमत 4000 कोटींहून अधिक असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.
सोबतच, टेलर स्विफ्टच्या मांजरीनंतर जगातील सर्वात महागड्या प्राण्यांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन टीव्ही होस्ट ओप्रा विन्फ्रेचे कुत्रे शेडी, सनी, लॉरेन, लायला आणि ल्यूक यांचा समावेश आहे, ज्याची किंमत सुमारे 250 कोटी आहे. पोमेरेनियन जातीचा जिफपोम नावाचा कुत्रा चौथ्या क्रमांकावर असून त्याची किंमत 200 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. जर्मन फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्डची मांजर पाचव्या क्रमांकावर आहे, तिची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. प्रसिद्ध अभिनेत्री बेटी व्हाईटच्या कुत्र्याची किंमत 40 कोटींहून अधिक नोंदवण्यात आली आहे.