मेक्सिकोत ७.४ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा
![7.4 magnitude earthquake shakes Mexico Tsunami warning](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/earthquake.jpg)
नवी दिल्ली |
मंगळवारी रात्री दक्षिण मेक्सिकोमध्ये अॅकापुल्कोच्या रिसॉर्टजवळ भूकंपाचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे मेक्सिको शहरातल्या २०० मैलांवरच्या इमारतीही हादरल्या आहेत. भूकंपानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. शहरात भूकंपाचे धक्के बसले तेव्हा लोकांनी हादरलेल्या इमारतींचे फुटेज शेअर केले. अमेरिकेच्या भूकंपशास्त्र विभागाने सांगितले की, भूकंपाची प्राथमिक तीव्रता ७ ते ७.४ इतकी होती.
A M7.0 quake occurred near Acapulco tonight. The location and focal mechanism are consistent with being part of the plate boundary where the Cocos plate is goin under the North American plate. M7 is smaller than many subduction zones, but common in the Mexico subduction zone
— Dr. Lucy Jones (@DrLucyJones) September 8, 2021
भूकंपाचा केंद्रबिंदू रिसॉर्ट शहरापासून ४८ किलोमीटर (३० मैल) अंतरावर असलेल्या गुएरेरो राज्यातील पुएब्लो मॅडेरोच्या ८ किलोमीटर (सुमारे 5 मैल) पूर्व-केंद्रस्थानी होती. भूकंप क्षेत्राकडून तात्काळ कोणतेही अहवाल आले नाहीत. मेक्सिको शहरात, राजधानीच्या काही भागात जवळपास एक मिनिट हादरे बसत होते. नुकसानीची कोणतीही प्राथमिक माहिती नाही.
#Breaking: Magnitude 7.4 earthquake in Acapulco, Mexico#BreakingNews #earthquake #Mexico #Acapulco #Usa #Colombia #Haiti #UK #UN #Nato #France #India #Russia #China #Afganistan #Pakistan #Iran pic.twitter.com/3vSy05Z7OQ
— The HbK (@The5HbK) September 8, 2021