Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हिजाब घातल्याने ५८ विद्यार्थिनी निलंबित; कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला

  • कर्नाटकातील अनेक शिक्षण संस्थांनी प्रवेशही नाकारला

कर्नाटक |

कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या आणि प्रशासनाविरोधात निदर्शने करणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना शनिवारी निलंबित करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतरही कर्नाटकाच्या अनेक भागांतील विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याने त्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. शिवमोगा जिल्ह्यातील शिरालकोप्पा येथे हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनींना निलंबित करण्यात आले.

‘‘आम्ही महाविद्यालयात आलो, पण प्राचार्यानी आम्हाला निलंबित केल्याचे सांगितले. पोलिसांनीही आम्हाला महाविद्यालयात येण्यापासून रोखले. आमच्याशी कोणीही संवाद साधला नाही’’, असे निलंबित विद्यार्थिनींनी सांगितले. राज्य सरकारचा आदेश आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाद्वारे विद्यार्थिनींना वर्गात हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालण्यास मज्जाव करण्यात आला असूनही मुली हिजाब घालून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आल्या होत्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button