breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Mahashivratri 2024 | आज महाशिवरात्रीला ५ दुर्मिळ योग; जाणून घ्या शुभ मुहूर्त

Mahashivratri 2024 | आज देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी होत आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. अनेकजण शंकराला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी उपवास करतात, तर अनेकजण महादेवाची मनोभावे पूजा करुन आपल्या इच्छा व्यक्त करतात.

पौराणिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. या दिवशी उपवास आणि विधीपूर्वक पूजा केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

हेही वाचा     –      ‘भाजपचा राजीनामा द्यावा, आम्ही त्यांना मविआतून निवडून आणू’; नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंची ऑफर 

यावेळी महाशिवरात्रीला शिवयोग, सिद्ध योग, गजकेसरी योग, धन योग आणि सर्वार्थ सिद्धी असे शुभ योग तयार होत आहेत, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे.

पूजेचे शुभ मुहूर्त :

पहिल्या प्रहरातील पूजा – संध्याकाळी ०६:१८ ते ०९:२० पर्यंत

दुसऱ्या प्रहरातील पूजा – रात्री ०९:२० ते १२:४० पर्यंत

तिसऱ्या प्रहरातील पूजा – रात्री १२ :४० ते ०३:४५पर्यंत

चौथ्या प्रहरातील पूजा – रात्री ०३:४५ ते सकाळी ०६:५३ पर्यंत

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button