टायटॉनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या ५ जणांचा मृत्यू
![5 people died who went to see the remains of the Titanic](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Titanic-780x470.jpg)
टायटॉनिकचे अवशेष पाहयला गेलेली पाणबुडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. केवळ ९४ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवार १८ जून रोजी समुद्राच्या तळाशी झेपावली होती. परंतु काही तासांत या पाणबुडीचा संपर्क तुटला. त्यानंतर ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. अखेर या पाणबुडीचा शोध लागला आहे.
अमेरिकेसह कॅनडाच्या नौदलाने तसेच पाणबुडी ऑपरेट करणाऱ्या कंपनीने ही पाणबुडी शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर या पाणबुडीचा शोध लागला आहे. टायटॉनिकचे अवशेष पाहयला गेलेली पाणबुडीतल्या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशिएनगेटने दिली आहे.
हेही वाचा – Monsoon Update : राज्यात आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार
पाणबुडीवर पायलट, ब्रिटिश साहसी नागरिक, धनाढ्य पाकिस्तानी कुटुंबातील दोन सदस्य आणि अन्य एका प्रवाशाचा समावेश होता. हे सर्वजण अब्जाधीश होते. यामध्ये ओशिएनटगेटचे सीईओ स्टॉकटन रश, शहजादा दाऊद आणि त्याचा मुलगा सुलेमान दाऊद, हामिश हार्डिंग आणि पॉल हेनरी नार्जियोलेट यांचा समावेश होता.