Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
तालिबानच्या वाहनांवरील हल्ल्यात ५ जण ठार
![5 killed in Taliban attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/terrorist.jpg)
काबूल |
अज्ञात हल्लेखोरांनी बुधवारी पूर्व अफगाणिस्तानात तालिबानच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात तालिबानचे किमान २ दहशतवादी व ३ नागरिक ठार झाले. तालिबानने ऑगस्टच्या मध्यात देशावर ताबा मिळवल्यापासून घडलेला हा सर्वात अलीकडचा हिंसाचार आहे.
एका हल्ल्यात बंदूकधाऱ्यांनी जलालाबाद या प्रांतिक राजधानीतील एका पेट्रोल पंपावर एका तालिबानी वाहनावर गोळीबार केला. यात तालिबानचे २ सदस्य व पेट्रोल पंपावरील एक सहायक ठार झाला. गोळीबारात एक लहान मुलगाही मारला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जलालाबादमध्येच दुसऱ्या एका वाहनावर करण्यात आलेल्या बॉम्बहल्ल्यात एक मुलगा ठार झाला, तर तालिबानचे दोन दहशतवादी जखमी झाले. या ठिकाणी उभा असलेला एकजण हल्ल्यात जखमी झाला.