Breaking-newsताज्या घडामोडी

31 डिसेंबरचं सेलिब्रेशन जीवावर बेताल, BMW कारच्या अपघातात 2 ठार 3 जखमी

औरंगाबाद | महाईन्यूज

औरंगाबाद शहरातील दौलताबाद किल्ल्याजवळ बीएमडब्लू कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून गाडीचा चक्क चेंदामेंदा झाल्याचं दिसून येते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 31 डिसेंबरची पार्टी केल्यानंतर घराकडे जात असताना मध्यरात्री 2 वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच दु:खाचा डोंगर पीडित कुटुंबीयांवर कोसळलेला आहे. मंगळवारी रात्री सर्वत्र 31 डिसेंबरच्या पार्ट्या अन् नववर्षाच्या स्वागताची धूम सुरू होती. त्यात, 31 डिसेंबरच्या पार्टी करताना, वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याचं पोलिसांकडून बजावण्यात येत होतं. तसेच, मद्यप्राशनही न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं होतं. मात्र, ही दुर्दैवीपूर्ण घटना घडली आहे.

दौलताबाद किल्ल्यासमोर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार (BMW एम.एच 20 ई एफ 0707) रस्त्यालगतच्या विहिरीत पडली. यात सौरव विजय नंदुरकर (वय 29 वर्षे) राहणार रोकडया हनुमान मंदिर एन 4 सिडको आणि वीरभास मुकुंद कस्तूरे (वय 34 वर्षे) रा सिडको या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी असून त्यांच्यावर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि संबंधित नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने ही कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. गाडीतून मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button