१३ ऑक्टोबरला लाँच होवू शकतो Apple iPhone 12 स्मार्टफोन
नवी दिल्ली- अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यंदा अॅपल कंपनीला मोडावी लागली आहे. नवीन आयफोन सीरीज सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची परंपरा यंदा करोनाच्या लॉकडाऊनमुळे मोडावी लागली. नवीन आयफोन १२ सीरीज लाँच करण्याची तारीखवरून अनेक रिपोर्ट्स समोर आली आहेत. आता काही ताज्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नवीन अॅपलचा Apple iPhone 12 स्मार्टफोन येत्या १३ ऑक्टोबर रोजी लाँच केला जावू शकतो.
MacRoumors च्या माहितीनुसार, लाँच इव्हेंट संपल्यानंतर प्री ऑर्डर सुरू होतील. नवीन स्मार्टफोन्स १६ ऑक्टोबर पासून उपलब्ध होतील. परंतु, काही सूत्रांच्या माहितीनुसार फोन २३ ऑक्टोबर पासून मिळणे सुरू होईल. या फोनच्या द्वारे कंपनी ५जी कनेक्टिविटी देणार आहे.
लाँच करण्यात येणार चार मॉडल्स
मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आयफोन १२ सीरीजद्वारे अॅपल कंपनी एकत्र चार स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. यात ६.१ इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 12 आणि 12 Pro असणार आहे. तसेच ६.७ इंचाचा iPhone 12 Pro Max आणि एक iPhone 12 mini मॉडल असू शकतो. आयफोन १२ मिनी स्मार्टफोनमध्ये ५.४ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
किंमती किती असू शकते
एका ताज्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, आयफोन १२ ची किंमत आयफोन ११ पेक्षा जास्त असू शकते. रिपोर्टच्या माहितीनुसार, ५ जी सपोर्ट करणाऱ्या आयफोन १२ च्या किंमती कमी ठेवण्याची शक्यता नाही. आयफोन १२ ची किंमत ६९९ डॉलर पासून ७४९ डॉलर दरम्यान असू शकते.