ह्युंदाई क्रेटाचा जलवा, भारतात बनवला नवा रेकॉर्ड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/hyundai-creta.jpg)
नवी दिल्ली | Hyundai Creta भारतीय बाजारात जबरदस्त प्रसिद्ध आहे. याएसयूव्हीने विक्रीचा एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. इंडियन मार्केटमध्ये क्रेटाची विक्री ५ लाखांच्या युनिटपर्यंत पोहोचली आहे. एसयूव्हीने हा आकडा जवळपास ५ वर्षात पूर्ण केला आहे. ह्युंदाई क्रेटाला भारतात २०१५ मध्ये लाँच करण्यात आले होते.
ह्युंदाईने यावर्षी मार्चमध्ये क्रेटाचे सेकंड जनरेशन मॉडल लाँच केले आहे. जुन्या मॉडलच्या प्रमाणे या नवीन नवीन क्रेटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा नवीन क्रेटा मे, जून आणि जुलै या तीन महिन्यात या कारची ५५ हजार बुकिंग करण्यात आली आहे. देशात लॉकडाऊन असताना सुद्धा मे, जून आणि जुलै मध्ये क्रेटा सर्वात जास्त विकली जाणारी एसयूव्ही ठरली. जुलै महिन्यात ११ हजार ५४९ युनिट क्रेटाची विक्री झाली आहे.
न्यू जनरेशन क्रेटा नवीन लूक आणि नवीन फीचर सोबत बाजारात उतरवण्यात आली आहे. ही पहिल्या पेक्षा मस्क्यूलर, बोल्ड आणि स्पोर्टी दिसते. यात इंजिनचे तीन पर्याय आहेत. यात 138bhp पॉवरचे 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल, 115bhp पॉवरचे 1.5-लीटर पेट्रोल आणि 115bhp पॉवरचे 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचा समावेश आहे.