हुगळीतील तारकेश्वर मंदिर प्रकरणी न्यायालयात जाणार नाही – सुब्रम्हण्यम स्वामी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/subramanianswamy-ji.jpg)
कोलकाता (पश्चिम बंगाल) – हुगळीतील तारकेश्वर मंदिर प्रकरणी न्यायालयात जाणार नसल्याची माहिती भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी दिली आहे या प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आपण न्यायालयात जाण्याचा विचार सोडून दिला असल्याचे त्यांनी सांगितले तारकेश्वर मंदिर प्रकरणी राजकीय हस्तक्षेप न करण्याचे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी सुब्रम्हण्यम स्वामी यांना दिले आहे.
कोलकात्यात आपण राजकीय कारणांसाठी नाही, तर तारकेश्वर मंदिर प्रकरणी ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी आलो होतो; असे सुब्रम्हण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. तारकेश्वर मंदिर वा राज्यातील अन्य कोणत्याही मंदिराच्या धार्मिक कामकाजात सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी त्यांना आश्वासन दिले असल्याचे सुब्रम्हण्यम स्वामींनी मीडियाला सांगितले.
केवळ मंदिराचा न्यासच मंदिराचे धार्मिक कामकाज पाहील असे त्यांनी सांगितले आहे. हुगळीमधील सुमारे 300 वर्षे जुने असलेल्या तारकेश्वर मंदिराच्या विकास मंडळ अध्यक्षपदी ममता बॅनर्जी यांनी शहर विकास मंत्री फिरहाद हकीम यांची नियुक्ती केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.