Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीचा कहर… रस्ते, वीज, पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/EOz-NIEWoAkbL4L.jpg)
शिमला । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी तुफान सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह तब्बल ४४६ रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, १२१ ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रदेशातील १९ ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Himachal-Pradesh-1024x583.jpg)