Breaking-newsताज्या घडामोडी
हिंगणघाट प्रकरण : आरोपीचे कुटुंबीय अज्ञात स्थळी निघून गेले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Hinganghat-2.jpg)
नागपूर | हिंगणघाट फुलराणी जळीत प्रकरणातील आरोपी विकी नगराळे याचे कुटुंबीय वाढता जनक्षोभ पाहता स्वत:च सुरक्षित ठिकाणी निघून गेले आहेत. ३ फेब्रुवारीला विकी या नराधमाने फुलराणीला पेट्रोल टाकून पेटवून दिले होते.
त्यानंतर हे कुटुंबीय सुरक्षित ठिकाणी गेल्याचे वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितले. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड राेष होता. यामुळे आरोपीच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त होता. मात्र, हे कुटुंबीय स्वत:हून निघून गेल्याचे तेली यांनी सांगितले आहे.
बलात्कार, हत्येतील आरोपीला अनेकदा तुरुंगातही धोका असतो. कारण इतर आरोपी बलात्कारातील आरोपीला मारहाण करण्याच्या घटना घडतात. त्यांना अशा आरोपीची चीड असते. हे लक्षात घेऊन तुरुंगात आरोपीच्या सुरक्षेची काळजी घेतल्याची माहिती वर्ध्याचे तुरुंग अधीक्षक सुहास पवार यांनी दिली आहे.