‘हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा’, ‘त्या’ ट्विटनंतर काँग्रेसने अक्षय कुमारला सुनावले
![Akshay Kumar Corona hospitalized for treatment](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/WhatsApp-1.jpeg)
नवी दिल्ली – जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आंदोनाची दखल घेतली गेली. रिहानानंतर अनेकांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर परराष्ट्र मंत्रालयाला स्पष्टीकरण जारी करावे लागले. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने देखील उडी घेत ट्विट केले.मात्र शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या अक्षय कुमारला छत्तीसगड काँग्रेसने जोरदार टोला लगावत हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
वाचा :-शेतकरी आंदोलनावर सचिन तेंडुलकरसह गंभीर, विराटचे ट्विट; म्हणाले…
अक्षय कुमारने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करत म्हटले होते की, शेतकरी हा आपल्या देशाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी, सामंजस्य ठरावाचे समर्थन करा. याच ट्विटवरून अक्षय कुमारवर आता काँग्रेसने निशाणा साधला आहे.
यह हमारे देश का आंतरिक मामला है https://t.co/g4w6HWaVOp
— INC Chhattisgarh (@INCChhattisgarh) February 3, 2021
अक्षय कुमारला त्याच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्यावरून सातत्याने लक्ष केले जात आहे. आता आपल्या हटके ट्विटसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या छत्तीसगड काँग्रेसने ‘हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे’ म्हणत अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे.