हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर फक्त क्लीनिकल ट्रायलसाठीच करावा-WHO
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/who-corona.jpg)
जिनेवा | जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या इमरजेंसी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माइक रेयान यांनी सांगितले की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन किंवा क्लोरोक्वीनचा वापर फक्त क्लीनिकल ट्रायलसाठीच करावा. या दोन्ही औषधांचा अनेक आजारांसाठी उपयोग होत आहे. कोरोनाच्या उपचारातही या औषधांची चांगली मदत झाली आहे, पण यातून अनेकवेळा साइड इफेक्ट्स झाल्याचेही समोर आले आहे.
डॉ. रेयान पुढे म्हटले की, अनेक देशांनी या औषधांच्या वापर कमी केला आहे. या औषधांना मेडिकल एक्सपर्टच्या निगरानीत फक्त कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या हॉस्पीटलमध्येच केले जात आहे. तसेच, प्रत्येक देशातील प्रशासनाने आपल्या पद्धतीने आढावा घेऊन या औषधाचा वापर करायचा, का नाही हे ठरवावे.
लहान देशांमध्ये संक्रमण पसरण्याची भीती: डब्ल्यूएचओ
डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेडरोस गेब्रियेसस म्हणाले की, देशात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या लहान देशांमध्ये या व्हायरसचे संक्रमण पसरण्याची जास्त भीती आहे.