हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबाची अवस्था वेदनादायी – जितेंद्र आव्हाड
मुंबई| एका मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, रातोरात त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येते. हे सगळं मन व्यथित करणार, यातना देणार आहे. इतक्या क्रूरपणे प्रशासनाने वागावं हे योग्य नाही, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. हाथरस प्रकरणी सरकार बोलायला तयार नाही, सरकारची माणसं तिथे जायला तयार नाहीत. कुटुंबाला विळखा घालून त्यांना बंद करण्यात आले. दलित कुटुंबाची आजच्या युगामध्ये ही अवस्था वेदनादायी आहे, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या.
हाथरस प्रकरणी आम्हाला माध्यमातून माहिती मिळाली आहे. त्यामधून सध्या परिस्थिती भयानक दिसत आहे. राष्ट्रपती लागवट , राजीनाम्याची अथवा सरकार बरखास्त करण्याची मागणी करून काही फायदा नाही, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. आता सुरु आहे त्यापेक्षा आणखी जोराने त्या ठिकाणी हुकुमशाही करण्यात येईल. तिथे लहान जाती आणि तिथल्या शोषितांबद्दल प्रेम आपुलकी असल्याचे अजिबात नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
बिहारमध्ये यापूर्वी एक हत्याकांड झाले होते. इंदिरा गांधी त्यावेळी सत्तेत नव्हत्या. मात्र, त्या ठिकाणी गेल्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी जिद्द ठेवून त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी आसपासच्या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी जमले होते. इंदिरा गांधींनी त्या लोकांना भाषण द्यायला आली नसून पीडित कुटुबांचे अश्रू पुसण्यासाठी आली आसल्याचे सांगितले. यानंतर देशातील वातावरण बदललं आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. हाथरस प्रकरणाने देशातील वातावरण बदलले आहे.
ज्या पद्धतीचं वर्तन सत्ताधाऱ्यांचा आहे त्यानुसार सत्ते पुढे काही चालू शकत नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या भावनेचे उत्तर जनतेच्या मनात असत जनताच योग्य वेळेला योग्य उत्तर देईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत यूपी पोलिसांनी केलेल्या वर्तनाबद्दल बोलताना म्हटले.