‘हवेतून कोरोनाचा प्रसार होतो’ तज्ज्ञांच्या ‘या’ दाव्यावर WHO ने दिलं उत्तर…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/tarikjasarevic-who-5april17-625-415.jpg)
कोरोनाचा प्रसार वाढत असताना ३२ देशातील 132 शास्त्रज्ञांनी असा दाव केला होता की कोरोनाचे विषाणू हे हवेच्या माध्यमातून पसरू शकतात आणि त्यातूनही त्यांचा संसर्ग मानसाला होऊ शकतो असही त्यांनी सांगितल होत..तसेच यावर पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेनं संशोधन कराव असही त्यांनी म्हटलं होत. त्याबाबतच एक पत्रही या शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला पाठवलं होतं. संशोधकांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला गाईडलाईन्स देण्याची मागणी केली आहे.
हवेत असलेल्या सामान्य व्हायरसच्या कणांमुळेही लोकांमध्ये संक्रमण पसरत आहे. तसंच कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.
मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ता तारिक जसारेविक यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस हवेतून पसरतो की नाही. यावर पळताळणी आणि परिक्षण सुरू आहे. पण कोरोना हवेतून कसा पसरतो याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. पण कोरोनाचा प्रसार खरंच हवेमार्फत होत असेल तर WHO कडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर लोकांमध्ये ३.३ फुटांचे अंतर असायला हवे. तरेच संक्रमणाचा धोका टळू शकतो.